You are currently viewing कनेडी येथे विवाहितेची गळफास लावून आत्‍महत्‍या

कनेडी येथे विवाहितेची गळफास लावून आत्‍महत्‍या

कनेडी येथे विवाहितेची गळफास लावून आत्‍महत्‍या…

कणकवली

तालुक्‍यातील कनेडी येथील काव्या कॉम्लेक्‍समध्ये राहणाऱ्या विवाहितेने गळफास लावून आत्‍महत्‍या केली. स्वरा प्रशांत गावकर (वय ३३) असे तिचे नाव आहे. दुपारी १२.४५ वाजण्यााच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी मृत विवाहितेचा दीर प्रदीप विजय गावकर याने विवाहितेच्या मृत्‍यूची चौकशी होण्याबाबत आज येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

स्वरा गावकर ही पती, सासू, सासरे आणि छोट्या मुलासमवेत कनेडी येथील काव्या कॉम्प्लेक्‍समध्ये राहतात. दुपारी १२.४५ च्या सुमारास स्वरा हिचा पती घरी आला असता घराचा दरवाजा बंद होता. दार ठोठावूनही दरवाजा उघडला जात नसल्‍याने त्‍याने खिडकीकडे येऊन पाहिले असता, स्वरा ही पंख्याच्या हुकला गळफास लावलेल्‍या स्थितीत आढळून आली. त्‍यानंतर प्रशांत याने शेजाऱ्यांनी मदत घेऊन दरवाजा तोडला. स्वरा हिचा गळफास सोडून तिला कनेडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्‍यू झाला. या मृत्‍यू प्रकरणाची चौकशी व्हावी अशी फिर्याद स्वरा हिचा दीर प्रदीप गावकर याने पोलिसांत दिली आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + one =