*काव्यांगण साहित्य मंचातर्फे उमरग्यात दुसरे राज्यस्तरीय कविसंमेलन*
उमरगा : येथील काव्यांगण साहित्य समूहाच्या वतीने राज्यपातळीवरचे दुसरे काव्यांगण दीपोत्सव कविसंमलनाचे आयोजन येत्या २५ ऑक्टोंबर रोजी पोतदार इंग्लिश स्कूलच्या सभागृहात होणार असल्याची माहिती संमेलनाचे प्रमुख विकास राठोड यांनी दिली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून निवडक निमंत्रित साहित्यिक कवी सहभागी होणार आहेत.या राज्यपातळीवरच्या कविसंमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिध्द साहित्यिक तथा व्याख्याते अहिल्यानगरचे मा.सुभाष सोनवणे ,उद्घाटक उमरगा लोहारा विधानसभेचे आमदार मा. प्रवीण स्वामी ,उदघाटक. मा प्रा. दिलीप पवार उमरगा,स्वागताध्यक्ष पोतदार इंग्लिश स्कूलचे प्राचार्य, मा.बि.पी.सिंग, प्रमुख पाहुणे समाज विकास संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक विचारवंत मा.भूमिपुत्र वाघ,
मा. डॉ. संजय राठोड, कवयित्री,गीतकार मा. सुवर्णा पवार, इचलकरंजी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून काव्यांगण साहित्य मंचाचे संस्थापक अध्यक्ष मा. विकास राठोड यांनी उमरगा आणि पंचक्रोशीत साहित्यिक चळवळ अत्यंत तळमळीने आणि मोठ्या उत्साहाने सुरुवात केली आहे.साहित्य हा समाजाचा आरसा आहे, समाजाचे वास्तव हे साहित्यातून प्रतिबिंबित होत असते. कविता म्हणजे मानवी मनाचा भावनात्मक असा अविष्कार असतो. कवीची कल्पनाशक्ती प्रतिभा आणि भावनात्मक अविष्कार यातून समाजातले, निसर्गातले आणि आपल्या मनातले उत्स्फूर्त वास्तव कविता या साहित्य प्रकारातून चित्रित होत असते. साहित्यिकांना विचारपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विकास राठोड हे नेहमीच अव्यहातपणे धडपडत असतात.
काव्यांगण साहित्य मंच यातर्फे यावर्षीही २५ऑक्टोबरला दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन घेण्याचे योजिले आहे ,असे अध्यक्ष विकास राठोड यांनी बोलताना सांगितल. सर्व सहभागी कवींना काव्यांगण साहित्य समूहातर्फे प्रोत्साहन देण्यासाठी सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर साहित्य समाजसेवा आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या साहित्य कलावंत यांना त्यांच्या कार्याची गती द्विगुणित करण्यासाठी काव्यांगण साहित्य मंचातर्फे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यात
काव्यदीप पुरस्कार २०२६
डॉ.स्वाती खंदारे, पुणे यांना जाहीर झाला असून ॲड दिलीप कांबळे, धाराशिव(आदर्श समाजसेवक पुरस्कार..2026),सुभाष चव्हाण, धाराशिव(आदर्श शिक्षक पुरस्कार..2026),मंगल बोराडे, तुळजापूर(उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार 2026),सुदर्शन जोशी, धाराशिव, (उत्कृष्ट निवेदक पुरस्कार..2026)गौतम अंबादास बाकले, धाराशिव,(आदर्श समाजसेवक पुरस्कार 2026),भावना गांधीले, अहिल्यानगर,(आदर्श शिक्षिका पुरस्कार2026),वर्षा ननवरे, इंदापूर,(काव्यदीप पुरस्कार 2026),अमेय मुळे, डोंबिवली(उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार 2026),शमशाद जावेद पटेल, सोलापूर(आदर्श शिक्षिका पुरस्कार 2026),रंजिता पवार, उमरगा
(आदर्श समाजसेविका पुरस्कार 2026),भाग्यश्री देवकते (बाचके )उमरगा
(उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार 2026),प्रा. निशा घोसले जमादार, लातूर
(हिरकणी पुरस्कार 2026),मा.अनुराधा मारचट्टीवार, हैद्राबाद
(रणरागिणी पुरस्कार 2026) असे एकूण चौदा पुरस्कार देण्याचे काव्यांगण समूहाचे अध्यक्ष विकास राठोड, उपाध्यक्ष अयान मौजन, सचिव वृंदा गंभीर, कार्याध्यक्ष मा. नागसेन कांबळे, सहसचिव स्नेहा जाधव आणि कोषाध्यक्ष सिद्धीविनायक शिंदे यांनी जाहीर केले आहे .या कविसंमेलनाचा आणि आनंदसोहळ्याचा जास्तीत जास्त रसिक व काव्यप्रेमिनी आस्वाद घ्यावा असे आवाहनही काव्यगण साहित्य मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.
