You are currently viewing चाहूल आनंदाची ….

चाहूल आनंदाची ….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चाहूल आनंदाची ….!!*

शुभेच्छापत्र..दसरा दिवाळीचे

 

सहजच सांग मना….तू

आनंदाची चाहूल येते केव्हा

बाळाच्या जन्माची चाहूल

घराला येते तेव्हा…

 

सुखकायेच्या हुंकारात वात्सल्यध्वनी

अमृतात तान्हुला …भिजतो तेव्हा..

आभाळमायेचा पाऊस झडीचा

भक्तीरसात भुईला स्पर्शितो जेव्हा..

 

आनंदाची चाहूल पेरणीच्या सुखाची

तुरीच्या शेंगात ..सोले भरण्याची

चाहूल उसाच्या पेरात ..गोडीची

आनंदी कापसाची बोंड उलण्याची

 

आनंद पेरलेली ज्वारी दवावर येण्याची

हस्ताच्या उन्हांत तापलेल्या जमीनीची

चाहूल मोठया पेरणीला… धाकट्या पेरणीची

चाहूल येणा-या… दसरा दिवाळीची

 

आनंदाची चाहूल ..जिकडे तिकडे

लेऊन मृदुलकांती शृंगारलेल्या धरेचा

वासरू गाईच्या वासल्यस्पर्शात जपला

कणाकणांत आनंद निसर्गाने परब्रम्हाचा

 

अबोल मना …आता तरी बोल जरा

चाहूल आनंदाची अजून कसली करतोस

जीवानं बांधली झोपडी… परब्रम्हाच्या शिवारात….

निराकाराला आकार कां उगाच देतोस.

सांग मना तूच…आता..!

आनंदाची चाहूल येते केव्हा..!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा