You are currently viewing मतदानपूर्व आणि मतदान दिवशीच्या मुद्रित माध्यमातील जाहिरातींसाठी ‘एमसीएमसी’चे प्रमाणपत्र बंधनकारक

मतदानपूर्व आणि मतदान दिवशीच्या मुद्रित माध्यमातील जाहिरातींसाठी ‘एमसीएमसी’चे प्रमाणपत्र बंधनकारक

जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष

सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार : कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी 23 ऑक्टोबर 2026 रोजी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच 22 ऑक्टोबर 2026 रोजी मुद्रित (वृत्तपत्रे) माध्यमांमध्ये कोणतीही राजकीय जाहिरात राज्य/जिल्हास्तरावरील माध्यम प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) प्रसिध्दीपूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे राजकीय पक्ष तसेच उमेदवार तसेच, वृत्तपत्रे यांनी जाहिरातीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय ती वृत्तपत्रात प्रकाशित करु नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026 अंतर्गत कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी मुद्रित माध्यमांमधून प्रसिध्दीसाठी द्यावयाची जाहिरात प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी माध्यम कक्ष, जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती, जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली येथे संपर्क साधून अर्ज सादर करावा. वृत्तपत्रांनीही अशी जाहिरात एमसीएमसी कडून प्रमाणित असल्याची खात्री करूनच प्रसिध्द करावी, असे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा