You are currently viewing योगशिक्षिका सौ.श्वेता हर्षद गावडे यांचा पालकमंत्री श्री.उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्याहस्ते सत्कार..

योगशिक्षिका सौ.श्वेता हर्षद गावडे यांचा पालकमंत्री श्री.उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्याहस्ते सत्कार..

कणकवली

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या योग क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय योगशिक्षक मुल्यमापक परीक्षेत कणकवली तालुक्यातील सौ.श्वेता हर्षद गावडे-पळसुले उत्तीर्ण झाल्याबद्दल आज महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन पास होणाऱ्या त्या एकमेव योगशिक्षिका आहेत.
या सत्कार प्रसंगी आमदार वैभव नाईक, शिवसेना युवानेते संदेश पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, तहसिलदार आर.जे.पवार, भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, आश्रम व्यवस्थापक विजय केळुसकर, विश्वस्थ मुरलीधर नाईक, राजु शेट्ये, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, कन्हैया पारकर, सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, संदेश पटेल, सचिन सावंत, अँड.हर्षद गावडे, संजय आंग्रे, प्रसाद अंधारी, वैदेही गुडेकर, रामु विखाळे, राजु राठोड, रश्मी बाणे, निसार शेख, बाळु पारकर, सुनिल पारकर, उमेश वाळके आदी उपस्थित होते.
सौ.श्वेता गावडे यांनी 2009 साली योग शिक्षणाला सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील त्या कणकवलीत योगाचे मार्गदर्शन करत आहेत. सौ.श्वेता या कणकवलीतील वकील श्री.हर्षद गावडे यांच्या पत्नी असुन एलआयसीचे विकास अधिकारी श्रीनिवास पळसुले यांच्या कन्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − nine =