*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”दुर्गा महिमा अपार”*
अंबा माता दुर्गा श्रीदेवीचा करू जागर
व्यापून राहे आदि शक्ती माया चराचरIIधृII
जगत् जननी ची स्थापना होते घटस्वरूपात
रात्रंदिन दीप तेवती करिती पूजन
कुळाच्यार रितीरिवाज चालतात पूर्वापारII1II
जगदंबेची रूपे सौम्य उग्र परिचित
उमा गौरी विश्वंभरी भवानी सौम्य द्योत
दुर्गा काली भैरवी चंडी चामुंडा रूप उग्रII2II
सृजनोत्सवाचा आरंभ साजरा होई सर्वत्र
नवी उमेद शक्ती बुद्धी युक्ती करी प्रदान
दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्या घेई अवतारII3II
व्याघ्रांबरीला ब्रह्मा विष्णू महेश नमित
शस्त्र त्रिशूल करी जीवसृष्टीचे रक्षण
वंदन करू उच्च रवाने जयजयकारII4II
©️काव्य:श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
