You are currently viewing महिला अत्याचार व ॲट्रॉसिटीच्या गंभीर गुन्ह्यातील संशयितास जामीन मंजूर;

महिला अत्याचार व ॲट्रॉसिटीच्या गंभीर गुन्ह्यातील संशयितास जामीन मंजूर;

महिला अत्याचार व ॲट्रॉसिटीच्या गंभीर गुन्ह्यातील संशयितास जामीन मंजूर;

ओरोस- सिंधुदुर्ग येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल.

सिंधुदुर्ग

वैभववाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला अत्याचार व अॅट्रॉसिटी (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध) कायद्यान्वये दाखल झालेल्या गंभीर प्रकरणात संशयित आरोपीस ओरोस येथील मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) सह अॅट्रॉसिटी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिनांक १५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपी श्री. दशरथ ऊर्फ लारा आत्माराम बोलये याने घरी एकटी असल्याचा फायदा घेऊन अत्याचार केला व बदनामी करण्याची धमकी दिली, असा आरोप ठेवत तक्रारदाराने वैभववाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवले होते.
मे. न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून गंभीर आरोप असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आरोपीचे मुख्य वकील अॅड. अशपाक शेख यांनी घटनेबाबत तक्रार नोंदवण्यास झालेला अवाजवी विलंब, वैयक्तिक वादातून केलेली तक्रार, तपासातील कायदेशीर त्रुटी आणि आरोपीची स्थानिक पार्श्वभूमी ही अत्यंत महत्त्वाची बाब मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच तपासाच्या कारणास्तव आरोपीस सतत कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद त्यांनी ठळकपणे मांडला.
बचाव पक्षाचा हा युक्तिवाद आणि तपासातील बाबी ग्राह्य धरून, ओरोस येथील मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. टी. त्रिपाठी साहेब यांनी संशयित आरोपी दशरथ ऊर्फ लारा आत्माराम बोलये यास ५०,०००/- हजार रुपयांच्या (पन्नास हजार रुपये) वैयक्तिक मुचलक्यावर व अटी-शर्तींवर जामिनावर मुक्त करण्याचा निकाल दिला.
सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने मुख्य वकील अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले असून अॅड. नामदेव मठकर, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख, ॲड. भुषण कदम व अॅड. हरेश वरावडेकर यांनी त्यांना सहाय्य केले.
१

प्रतिक्रिया व्यक्त करा