नवरात्रोत्सव मंडळांना भेटी; जिल्ह्याच्या सुख-समृद्धी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना
वैभववाडी : तालुक्यातील विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देऊन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी माता दुर्गेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. माता दुर्गेच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख-शांती, आनंद आणि समृद्धी नांदो, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राची प्रगती होवो, अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान उपस्थित भाविक, नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. तसेच सर्वांना नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची उपस्थिती पाहायला मिळाली.
