कोरोना उपाययोजनां संदर्भात कुडाळ पंचायत समितीत  सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक संपन्न

कोरोना उपाययोजनां संदर्भात कुडाळ पंचायत समितीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक संपन्न

कुडाळ :

कुडाळ तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना साखळी तोडण्याच्या अनुषंगाने आज कुडाळ पंचायत समिती येथे आमदार वैभव नाईक,प्रांताधिकारी वंदना खरमाळे,तहसीलदार अमोल पाठक,पोलिस निरीक्षक शंकर कोरे, सभापती नूतन आईर, नगराध्यक्ष ओंकार तेली  यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी  व अधिकारी यांची बैठक संपन्न झाली. यावेळी कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. रुग्णांसाठी बेड, औषध पूरवठा, ऑक्सिजन पुरवठा, कोविड  टेस्ट, लसीकरण, परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची तपासणी व कॉरंटाईन व्यवस्था तसेच बाजारपेठेतील गर्दी कमी करण्याबाबत  प्रभावी उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले.

यावेळी कुडाळ तालुक्यातील सरपंचांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी तालुक्यात जनता कर्फ्यु लावणे गरजेचे आहे याकडे लक्ष वेधले. त्यावर शहरातील व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्युबाबत निर्णय घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी व्यापाऱ्यांना केले.लवकरच व्यापाऱ्यांची बैठक घेऊन यासंदर्भात निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.

त्याचबरोबर तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्या ग्रामस्तरीय कमिटीने दर दिवशी गावातील परिस्थितिचा आढावा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.तसेच कंटेनमेंट झोन मध्ये बॅनर लावून जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

याप्रसंगी  जि.प.सदस्य संजय पडते, उपसभापती जयभारत पालव, तालुका आरोग्य अधिकारी श्री. कांबळे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण,माजी सभापती  राजन जाधव,पंचायत समिती सदस्य अरविंद परब,  मिलिंद नाईक, मथुरा राऊळ, राजन नाईक, सरपंच शेखर गावडे, दादा साईल, सचिन कदम, बाळा कोरगावकर, अनुप नाईक, विठ्ठल तेली, अमोल तेली, नागेश आईर यांसह अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा