You are currently viewing शाहू हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा रविवारी स्नेहमेळावा 

शाहू हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा रविवारी स्नेहमेळावा 

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

येथील राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दि. २८ मे रोजी यशवंत कार्यालय, चंदूर रोड, अलायन्स हॉस्पिटलजवळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी विद्यार्थी संघाच्यावतीने अध्यक्ष वसंत सपकाळे यांनी केले आहे.

शहरातील राजर्षी शाहू हायस्कूलच्या स्थापनेपासूनच्या सर्व माजी विद्यार्थी – विद्यार्थिनींना एकत्र आणून आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा हा सहावा स्नेहमेळावा असून माजी विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. रविवार दि.२८ मे रोजी सकाळी ८ वाजता सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रशालेत एकत्र येणार आहेत. येथे प्रार्थना, शिक्षकांचे मार्गदर्शन आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. यानंतर मुख्य रस्त्यावरून रॅलीने कार्यालयाकडे जाऊन मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यावेळी शिक्षकांचा सत्कार, मनोगत, माजी विद्यार्थ्यांसाठी विविध कलादर्शनाचा कार्यक्रम यासह मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले आहे. मेळाव्यासाठी नोंदणी आवश्यक असून भोजन व नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. तसेच या स्नेहमेळाव्यासाठी सर्व आजी-माजी शिक्षक उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. अधिक माहितीसाठी निमंत्रक जीवन बरगे – ९५५२४३५०५४, उपाध्यक्ष नेताजी बिरंजे – ९८२२९५६२६१ यांना संपर्क साधावा ,असे आवाहन शाहू हायस्कूल माजी विद्यार्थी संघाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + nine =