You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘नाताळ ‘ हा सण मोठ्या जल्लोषात साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘नाताळ ‘ हा सण मोठ्या जल्लोषात साजरा

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘नाताळ’ हा सण मोठ्या जल्लोषात आज दि. २२ डिसेंबर २०२२, गुरुवार रोजी साजरा केला गेला. शाळेचे संचालक आदरणीय श्री. रुजूल पाटणकर व सौ. काश्मिरा पाटणकर तसेच, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांचे प्रथम स्वागत करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ईयत्ता १ ली ते ४ थीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चमचा – लिंबू, संगीत खुर्ची, तसेच फुगा व गोल रिंग चा वापर करून विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. सर्व विद्यार्थ्यांनी रंगीत वेशभूषा परिधान केली होती. तसेच, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरीता देखील संगीत खुर्ची स्पर्धा ठेवण्यात आली. सर्व सणांप्रमाणे नाताळ या सणाचेही विद्यार्थ्यांना महत्त्व कळावे याकरिता सर्व विद्यार्थ्यांना नाताळाविषयी माहिती सांगण्यात आली. या दिवशी शाळेत सॅन्ताक्लॉझच्या आगमनाने सर्व विद्यार्थी आनंदित झाले. सर्व विद्यार्थ्यांना गोड पदार्थ वाटप करण्यात आले. या सणानिमित्त शाळेत सजावट करण्यात आली. उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, मदतनीस आनंदाने या सणानिमित्त केलेल्या उपक्रमात सहभागी झाले व शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशाप्रकारे मोठ्या जल्लोषात व उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा