You are currently viewing कणकवली शहर भाजपाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ८१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

कणकवली शहर भाजपाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ८१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

कणकवली :

मत्स्य व बंदरे विकास मंत्री, पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका आणि कणकवली शहर भाजपाच्या वतीने कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवार आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते  झाले. राज्याच्या कॅबिनेटमंत्री पदी आणि पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर नामदार नितेश राणे यांचा पहिलाच वाढदिवस आज साजरा करण्यात आला. त्यामुळे भाजपच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शेतकरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, उपतालुकाध्यक्ष संदीप सावंत, आशिये सरपंच महेश गुरव, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, तालुका चिटणीस समीर प्रभुगावकर, सुभाष मालंडकर, कळसुली सरपंच सचिन पारधीये, निसार शेख, समीर ठाकूर , सचिन आचरेकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका भाजपाच्या तसेच कणकवली शहर भाजपाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आठवडाभर आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा