You are currently viewing वारा संतापाचा
Oplus_16908288

वारा संतापाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वारा संतापाचा….*

 

वारा संतापाचा झोंबे करतो कसा तो लगट

हाकला त्याला हाकला त्याला भरू नका घट

 

वावटळ ती क्षणाचीच हो नासवते ती जीवन

कमावले ते गमावते नि पश्चातापाचे कारण…

 

येता जवळी क्षण तो मनाला पहा करावे सावध

नाही तर तो सहज करतो आपलीच हो पारध..

 

दयाक्षमाशांती हेच परवलीचे हो शब्द

मौन होता आपण होतो समोरचा तो नि:शब्द..

 

क्षोभ करे नुकसान आपले हानी आरोग्याची होते

बोलणारा बोलतो पण सांगा त्याचे काय जाते..

 

घेतो मनाला लावून आपण पायावरती दगड

सुख बघवत नाही कुणाला दुनिया आहे अवघड ..

 

मौन साधन उत्तम आहे पुन्हा पुन्हा ते वापरावे

मनुष्य धन हो अनमोल ते आपण त्याला जोडावे..

 

घेऊन जातो काय आपण देऊन जावे पहा “सही”नाहीतर हो कोरी रहाते आयुष्याची पुन्हा वही..

 

आला कोरडा गेला कोरडा कुणी आपणा म्हणू नये

स्वच्छ असेल कागद आपुला मुळीच वाटू नये भये..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा