You are currently viewing आता माहेर झाले

आता माहेर झाले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आता माहेर झाले*

————————————–

 

माहेराची ओढ अनावर

कन्या येते घरास परतुन

रूप बदलले त्याचे पाहुन

मनात जाते मग हिरमुसून

 

अंतर पडले. नात्यामध्ये

“तुझे आमचे”म्हणती सारे

झाडें, वेली, अंगण, परसू

खूप बदलले इथले वारे

 

ओटीवरच्या खिडकीमध्ये

अजून पक्षी गाणे गाती

जरा बदलता नक्षी चौकट

अनोळखी त्या ओल्या भिंती

 

माजघराची हवा थंडशी

चूल बोळकी इथे मांडली

दवणा, मरवा,फणेर पेटी

घरात आता कुठे हरवली

 

चुडा, जोडवी, टिळा रेखता

नाते सारे विरले गेले

माझे माझे म्हटलेले घर

“माहेर “अता माझे झाले.

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

 

प्रतिक्रिया व्यक्त करा