आंबडगावात वनराई बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ
माजी मंत्री दीपकभाई केसरकर व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
दोडामार्ग
आंबडगाव येथे पाणीटंचाईवर मात करण्यासोबतच पाण्याचे संवर्धन आणि जलसाठा वाढविण्याच्या उद्देशाने वनराई बंधारा बांधण्यात येत असून, या कामाचा शुभारंभ माजी मंत्री दीपकभाई केसरकर तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत झाला.
आगामी काळातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन गावातील पाणीसाठा वाढविणे, पाणी अडविणे आणि भूजल पातळीत वाढ करणे या उद्देशाने वनराई बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या शुभारंभ कार्यक्रमास विविध पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
