You are currently viewing सावंतवाडीतील प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांचे जिल्ह्यात घवघवीत यश

सावंतवाडीतील प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांचे जिल्ह्यात घवघवीत यश

सावंतवाडीतील प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांचे जिल्ह्यात घवघवीत यश

CIT, CCAOA व DTP परीक्षेत ९ विद्यार्थ्यांना जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक; सर्व २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांचे यश

सावंतवाडी :

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळातर्फे ऑगस्ट २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या CIT, CCAOA आणि DTP परीक्षेत सावंतवाडी येथील प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
CCAOA अभ्यासक्रमात शिवम जयानंद कानसे याने ८७.९५ टक्के गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. पूजा दिनेश मोरे हिने ८५ टक्के गुणांसह द्वितीय, तर संचिता राजू पारधी हिने ८२.७५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
CIT अभ्यासक्रमात सुरज कांता गावडे याने ८०.०५ टक्के गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. नेहा संदीप चव्हाण हिने ७९.५० टक्के गुणांसह द्वितीय, तर साक्षी संतोष केणी हिने ७८.२५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
DTP अभ्यासक्रमात पुनम नितीन नाटेकर हिने ८९.५० टक्के गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. कुणाल कांचन मायटी याने ८८.५० टक्के गुणांसह द्वितीय, तर देवयानी संजय सावंत हिने ८८.२५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी संस्थेतील एकूण २१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये निधी होडावडेकर, प्रिया लातिये, नेहा नेमळेकर, समृद्धी गावडे, समीक्षा तिवरेकर, आयुष जाधव, जगन्नाथ साळगांवकर, सिद्धेश पाटील, शिवम कानसे, रोहन गावडे आणि अक्षरा शिरोडकर यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य संदीप देवळी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना पल्लवी मेस्त्री आणि पुनम नाटेकर यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, संस्थेतर्फे आयटी, डीटीपी आणि टॅली अभ्यासक्रमांच्या नवीन बॅचसाठी प्रवेश सुरू असून इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा