You are currently viewing संदेश पारकर यांच्या उजाड झालेल्या शेतातील रुपेश नार्वेकर ही शेवटचे बुजगावणे!

संदेश पारकर यांच्या उजाड झालेल्या शेतातील रुपेश नार्वेकर ही शेवटचे बुजगावणे!

नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा रुपेश नार्वेकरना टोला

कणकवली शहराच्या राजकारणात संदेश पारकर यांच्या पाठीशी समीर नलावडे होते म्हणूनच संदेश पारकर हे नाव जिल्ह्याभरात त्यावेळी मोठे झाले. पण जेव्हा नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संदेश पारकर यांची साथ सोडली त्यानंतर पारकर यांनी आपली राजकीय कारकीर्द मागे वळून पाहिली तर त्यांना भ्रमाचा भोपळा फुटल्याचे दिसेल. संदेश पारकर यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या मदतीला धावून आलेले नगरसेवक रुपेश नार्वेकर हे पारकरांच्या उजाड झालेल्या शेतातले शेवटचे बुजगावणे असल्याची टीका नगरसेवक शिशीर परुळेकर यांनी केली आहे.
श्री नार्वेकर यांनी आपला वापर करून घेणाऱ्या पारकरां बद्दल कितीवेळा गळा काढावा याचा विचार करण्याची गरज आहे. निष्ठा हा शब्द पारकर यांच्या शब्दकोशातच बसत नाही. आतापर्यंत वर्षभराच्या उधारीवर निष्ठा ठेवणाऱ्या पारकर यांनी निष्ठे च्या गोष्टी बोलाव्यात हेच मुळी हास्यास्पद आहे. संदेश पारकर हे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले त्या विजयामध्ये समीर नलावडे यांचे मोठे योगदान आहे. समीर नलावडें मुळेच पारकर यांना नगराध्यक्ष होता आले. त्यानंतर पारकर आतापर्यंत केव्हाच नगराध्यक्ष होऊ शकले नाहीत. व कणकवलीची सत्ता पण मिळू शकले नाहीत. ही वस्तुस्थिती नार्वेकर यांना माहीत असून ते आंधळ्याची सोंग घेत आहेत ही दुर्दैवी परिस्थिती कोणावरच येऊ नये. संदेश पारकर यांच्या राजकीय उदया मागे समीर नलावडे व त्यांच्या कार्यकर्त्यांची ताकद होती. नलावडेंनी साथ सोडल्यानंतर पारकर यांचा राजकीय उदय केव्हा झालाच नाही. पारकरांची अस्ताच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. समीर नलावडे यांचा पाली दौराशी जोडला जात असलेला संबंध हा पारकर यांचा दिशाभूल करण्याच्या राजकारणाचा एक भाग आहे. खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्याशी निष्ठेने राहिल्यामुळेच समीर नलावडे यांना कणकवली नगरीचे नगराध्यक्ष पद मिळाले. नारायण राणे यांच्या विश्वासामुळे हे शक्य झाले. मात्र राजकारणाच्या अधोगतीकडे चाललेल्या नार्वेकर यांच्या नेत्याकडून आतापर्यंत कणकवलीत अशीच दिशाभूल राजकारण करण्याची परंपरा सुरू आहे. व ती नार्वेकर यांच्या रूपाने पुढे चालवली जात आहे. संदेश पारकर यांच्यामुळे समीर नलावडे ना आतापर्यंत पदे मिळाली हे नार्वेकर यांचे म्हणणे कितपत सत्य आहे ती मागच्या 15 वर्षाच्या निवडणूक आठवून पाहिलात तर लक्षात येईल. समीर नलावडे यांनी साथ सोडल्यानंतर कणकवली शहरातील सत्ता पारकर याना केव्हाच मिळवता आलेली नाही. नार्वेकर यांच्या नेत्याची कणकवलीत एवढीच ताकद होती तर ते स्वतः उभे राहूनही निवडणुकीला पराभूत झाले कसे. मग त्यांची ताकद अचानक भूमिगत कशी काय झाली? आमदार नितेश राणे यांनी कणकवलीच्या च्या विकासाचे व्हिजन घेत निवडणुकीत मते मागितली. मात्र पारकर यांनी त्यांच्याच एका भाडोत्री नेत्या जवळ ठेवलेल्या पैशावर लक्ष ठेवून निवडणूक लढवली. कणकवलीतील विश्रामगृहा वरील बैठकीत त्या रकमेचा आकडाही भाजपच्या नेत्यांच्या समोर फुटला होता. त्यामुळे पारकरांची निवडणूक लढवणे भूमिका कशासाठी असते ते कणकवलीकरांसोबत आता सर्वच राजकीय पक्षांना ही माहिती झाले आहे. संदेश पारकर यांनी नारायण राणेंवर टीका करताना आपली क्षमता नाही हे ओळखले नाही. त्यामुळेच त्यांना ती आठवण करून देण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना उत्तर द्यावे लागले. ब्लॅकमेलिंग करणे हा रुपेश नार्वेकर यांच्या नेत्यांचा पूर्वांपार चालत आलेला धंदा आहे. समीर नलावडे यांना दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळच आलेली नाही किंवा येणार नाही. मात्र नार्वेकर यांच्या नेत्यांना मात्र दुसऱ्या पक्षातून विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. राज्यात सत्ता नसतानाही आमदार नितेश राणे यांनी कणकवलीकराना निवडणुकीत जो शब्द दिला त्या पूर्ततेच्या दृष्टीने सत्ताधारी म्हणून समीर नलावडे यांची वाटचाल सुरू आहे. संदेश पारकर हे आतापर्यंत राणे विरोधाची बाहुली घेऊनच राजकारणात मोठे झाले. मात्र ज्यावेळी त्यांनी राणेंकडून पदे घेतली त्यानंतर पारकर यांचा खरा बुरखा फाटला गेला. नार्वेकर यांच्या नेत्यांनी आतापर्यंत हिमतींवर पदे मिळवली हे खरे आहे. मात्र हिम्मत त्यांची नव्हती तर दुसऱ्याच्या हिमतीवर आपली पोळी भाजून घेन्यात ते हुशार होते. पण आता ती हुशारी सगळ्याच राजकीय पक्षांनी ओळखल्यामुळे सध्या त्यांच्यावर राजकीय विजनवासात जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच त्यांना विधानसभेचे तिकीटही मिळालेले नाही. पारकर हे जिल्ह्याचे नेते आहेत हे नार्वेकर यांना सांगण्याची वेळ आली हेच पारकर यांचे कर्तुत्व सांगण्यासाठी पुरेसे आहे. कणकवली शहराच्या राजकारणात समीर नलावडे हे नाव मोठे होते हे पाहूनच पारकर त्यांच्या कंपुच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यात करून त्यांच्या बरोबर राहूनही आपल्याला बांधकाम सभापती पेक्षा पुढचे पद मिळणार नाही हे लक्षात आल्यानेच नार्वेकर यांच्याकडून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यावर आरोप करून मीच खरा पारकरांचा कट्टर समर्थक असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु नार्वेकर यांच्या हाती पारकरांसोबत राहून काहीच लागणार नाही. रुपेश नार्वेकर यांचे सख्खे बंधू महेश नार्वेकर यांना ही नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे नेतृत्व मान्य झाल्याने ते त्यांच्यासोबत काम करत आहेत. व पुढील काळात पारकर यांची कणकवलीत सत्ता येण्याचीही शक्यता नाही. कारण त्यांचा खरा चेहरा कणकवली शहरातील जनतेने ओळखले आहे. त्यामुळे पारकरांच्या उजाड झालेल्या शेतातील अखेरचे बुजगावणे असलेल्या नार्वेकर यांच्याकडे टीका करण्यापलीकडे काही काम उरले नसल्याची टीका शिशिर परुळेकर यांनी केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 9 =