You are currently viewing प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या केळुस कालवी बंदर येथे रामनवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या केळुस कालवी बंदर येथे रामनवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

वेंगुर्ला :

केळूस-कालवीबंदर येथील प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त २ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत सामाजिक नाटय स्पर्धा बरोबर धार्मिक,अध्याित्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील केळूस कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात दरवर्षी प्रमाणे श्रीरामनवमी उत्सव शनिवार २ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत जिल्हास्तरीय सामाजिक नाटय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.तसेच या नाट्य स्पर्धेबरोबरच सांस्कृतीक, अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळुस कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रामनवमी उत्सवानिमित २ एप्रिलला सायंकाळी ७.३० वाजता भजन, रात्रौ ९.३० वाजता सामाजिक नाटय़ स्पर्धेचे उदघाटन, रात्रौ १० वाजता ओमकार मित्रमंडळ नेरूर वाघचौकडी निर्मीत `चांडाळ चौकडी’ हे नाटक, ३ एप्रिलला सायंकाळी ७.३० वाजता श्री ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, परूळे यांचे भजन, रात्रौ १० वाजता सिंध्दांत फाऊंडेशन सिंधुदुर्ग निर्मीत `महाशुन्य’ हे नाटक, ४ एप्रिलला सायंकाळी ४ वाजता ह.भ.प. मकरंद देसाई याचे सुश्राव्य किर्तन, सायंकाळी श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ, आंदुर्ले यांचे भजन, रात्रौ १० वाजता गोपाळकृष्ण विभाग तळाशील निर्मीत `खर सांगायच तर’ हे नाटक, ५ एप्रिलला सायंकाळी ७.३० वाजता श्री सिध्देश्वर प्रासादिक भजन मंडळ, मुणगी यांचे भजन, रात्रौ १० वाजता वक्रतुंड थिएटर निर्मीत नेरूर देऊवाडा यांचे `डावी बाजू’ ६ एप्रिलला सयंकाळी ७.३० वाजता श्री देव भोम प्रासादिक भजन मंडळ, आंदुर्ले यांचे भजन, रात्रौ १० वाजता जिवनदायी विकास संस्था, वेंगुर्ले निर्मीत `बोगनवेल’ ७ एप्रिलला सायंकाळी ४ वाजता ह.भ.प. स्नेहलदिप सामंत (वालावल) यांचे सुश्राव्य किर्तन, सायंकाळी ७.३० वाजता श्री देवी आंदुर्लाई प्रासादिक भजन मंडळ, आंदुर्ले यांचे भजन, रात्रौ १० वाजता श्रीदेवी सातेरी प्रासादिक तरूण कला क्रिडा मंडळ, कवठी यांचे `डॉक्टर तुम्ही सुध्दा’ हे नाटक, ८ एप्रिलला सायंकाळी ४ वाजता ह.भ.प. अवधुत नाईक यांचे सुश्राव्य किर्तन, सायंकाळी ७.३० वाजता श्री. देवी तारादेवी भजन मंडळ, केळूस यांचे भजन, रात्रौ. १० वाजता अक्षरसिंधु कलामंच सिंधुदुर्ग निर्मीत `कायापालट’ हे नाटक, ९ एप्रिलला सकाळी ९ ते दुपारी १ पर्यत अखंड हरीनाम जप, सायंकाळी ४ वाजता हरीपाठ-मुणगी येथील विलास रेवणकर यांचा, रात्रौ ८ वाजता पाटील बंधु (कापडोस) यांचे सुश्राव्य गायन, रात्रौ १० वाजता ग्रामस्थांचे भजन, ह.भ.प. उत्तमबुवा केळूसकर यांचे हनुमान जन्मावर आधारीत सुश्राव्य किर्तन, रात्रौ १२ वाजता हनुमान जन्म, श्री ची पालखीतून मिरवणू व तिर्थप्रसाद,१० एप्रिलला सकाळी ८ ते १० ओटय़ा भरण्याचा कार्यक्रम, सकाळी १० ते १२ पर्यत ग्रामस्थांचे भजन, श्रीरात जन्मावर आधारीत उत्तमबुवा केळुसकर यांचे वारकरी किर्तन, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म, डिमकर कुटुंबियांचे हस्ते श्रीची ढोलताश्यांच्या गजरात पालखी मिरवणूक, तिर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता महापुरूष वारकरी भजन मंडळ, निवती यांचे भजन, ६.३० वाजता श्री विठ्ठल-रखुमाई समित्र वारकरी भजन मंडळ, निवती यांचे भजन, रात्रौ ९ वाजता ग्रामस्थांचे भजन व पालखी मिरवणूक, रात्रौ १०.३० वाजता सामाजिक नाटय़ स्पर्धेचे मान्यवरांचे हस्ते बक्षिस वितरण, रात्रौ ११ वाजता श्री गौतमेश्वर दशावतार नाटय़मंडळ, दाभोली यांचा दशावतारी नाटय़ प्रयोगया दशावतारी नाटकांत महिला पखवाजवादकाचे खास आकर्षण, पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. दररोज सकाळी श्रीची पुजा, दुपारी ग्रंथवाचन व हरीपाठ, रात्री ग्रामस्थांची भजने होणार आहे.या सर्व कार्यक्रमांचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कालवीबंदर येथील नवतरूण उत्साही कला क्रिडामंडळ व श्री विठ्ठल-रखुमाई उत्सव कमिटी आणि ग्रामस्थ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा