आंबडगावात वनराई बंधाऱ्याचा आज शुभारंभ
दीपक केसरकर, प्रमोद कामत यांची उपस्थिती; पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
दोडामार्ग :
आंबडगाव येथे वनराई बंधारा बांधकामाचा शुभारंभ आज सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर साहेब आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिक तसेच पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
