You are currently viewing भुमिपुत्रा जागा हो! विकासाचा धागा हो!..

भुमिपुत्रा जागा हो! विकासाचा धागा हो!..

बाळासाहेब सावंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशिक्षित, तरुण, शेतकऱ्यांचा कृषीव्यवसायातून आर्थिक विकास व्हावा! याकरिता तरुणांनी रोजगार व स्वयंरोजगार म्हणून नर्सरी उद्योग सुरु करावेत, असे आवाहन बाळासाहेब सावंत यांनी केले आहे

आपल्या जिल्ह्यामध्ये या व्यवसायाला मोठी संधी तसेच ई-कॉमर्स, च्या माध्यमातून मोठ, मोठ्या, बाजारपेठा उपलब्ध आहेत.
परंतु हे काम एकट्या सामान्य शेतकऱ्याला सहज शक्य होणार नाही, या करिता अशा शेतकऱ्यांनी ” कोकण नर्सरी ” या नर्सरी व्यवसायिक शेतकऱ्यांच्या संघटनेच्या मदतीने काम करावे.

असे आवाहन ज्येष्ठ शेतकरी नेते बाळासाहेब सावंत यांनी तरुण कृषी व्यवसायिकांना केले आहे.
याच विषयाच्या अनुषंगाने अशा
*व्यवसायिक शेतकऱ्यांची मीटिंग,*
*रविवार, दि. 8 मे 2022 रोजी, सकाळी 10 वा.,” कोकण नर्सरी ” कार्यालय, उषा कंट्रक्शन बिल्डिंग, तेली आळी* येथे आयोजित केली आहे.
*या बैठकीस फक्त नर्सरी व्यवसायिक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावयाचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा