You are currently viewing उद्या सावंतवाडीत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे निलेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

उद्या सावंतवाडीत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे निलेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडी :

 

लोकसभा निवडणुकीसाठी सावंतवाडीतील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील रामेश्वर प्लाझा येथे महायुतीचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सकाळी माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदिंसह पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती संजू परब यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा