डॉ. दिनेश नागवेकर यांना शिर्डी येथे साईबाबांची मुर्ती,
महावस्त्र व पादुका देऊन गौरव
शिर्डी –
सावंतवाडी येथील आरपीडी ज्युनि. कॉलेजचे निवृत्त शिक्षक, सनदी स्थापत्य अभियंता, इस्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्ससारख्या २१ संस्थांचे सदस्य, बांधकाम व्यावसायिक तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आणि दोडामार्ग हायस्कूल व ज्युनि. कॉलेजचे विद्यमान शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांना शिर्डी येथे सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, साईबाबांची मुर्ती, पादुका व साईबाबांचे महावस्त्र प्रदान करुन सन्मान करण्यात आला. शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे बी द चेंज फाऊंडेशन या संस्थेने हा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
डॉ. दिनेश नागवेकर यांनी ४५ वर्षांमध्ये समाज हिताची जाणीव ठेवून उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य केले आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच बांधकाम क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची तसेच शैक्षणिक संस्थेत केलेल्या कामाची दखल घेवून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माझ्या आयुष्यात मिळालेल्या अनेक पुरस्कारापैकी शिर्डी येथे मिळालेला पुरस्कार मला महत्त्वाचा वाटतो. साईबाबांची मुर्ती, पादुका आणि साईबाबांची शाल हा माझ्यासाठी साईबाबांचा आशिर्वाद आहे अशी भावना डॉ. नागवेकर यांनी व्यक्त केली.
