“आम्ही बालकवी” समूह सिंधुदुर्ग आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा संपन्न

“आम्ही बालकवी” समूह सिंधुदुर्ग आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा संपन्न

आम्ही बालकवी समूह सिंधुदुर्ग आयोजित पाऊस या विषयावर भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धा दिनांक ५ जून २०२१ ते ८ जून २०२१ या कालावधीत संपन्न झाली. सदर काव्य स्पर्धेसाठी राज्यभरातील कवींनी सहभाग घेतला होता. समूह प्रशासक श्री.राजेंद्र गोसावी यांनी स्पर्धेचे आयोजन केले मार्गदर्शन श्री दीपक नांगरे यांनी तर श्री दीपक पटेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

आम्ही बालकवी समूहातर्फे आयोजित या स्पर्धेसाठी पाऊस आठवणीतील, पाऊस हवाहवासा, पाऊस एक सखा असे विषय देण्यात आले होते. ही स्पर्धा तीन गटातून विभागून घेण्यात आली होती. प्राथमिक गट इयत्ता ५ वी ते ८ वी, माध्यमिक गट ९ वी ते १२ वी व इतर खुला गट असे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक गटातून कु.किमया गिरीश फटनाईक, पेंडुर,वेंगुर्ला हिला सर्वोत्कृष्ट नामांकन मिळाले तर माध्यमिक गटातून सर्वोत्कृष्ट कु.नाईला नबिल मिठागरी, चिपळूण आणि खुल्या गटातून सर्वोत्कृष्ट नामांकन संगीता रामटेके, गडचिरोली हिला मिळाले. या स्पर्धेत सौ नीता सावंत, सौ आदिती मसुरकर, सौ अनुराधा उपासे,सौ नीला सोनवणे, सौ भारती तिडके, गणेश पाताडे, अविनाश ठाकूर, अथर्व जोशी, कु.मधुरा गोंदाणे, स्वराज मसुरकर,वेदांत पंडित, वैभवी रेडकर, सिद्धी सोसे, श्रेयशी महालकर, मयूर रेवंडकर आदींनी देखील विजेतेपद मिळवले.

आम्ही बालकवी ही सामाजिक संस्था विविध स्पर्धांचे आयोजन करत असते. समाजाचे आपण देखील काहीतरी देणे लागतो या भावनेतून संस्थेच्या मार्फत समाजातील गोरगरीब होतकरू गरजू विद्यार्थ्यांना, साहित्य क्षेत्रात कार्यरत मुलांना वेळोवेळी मदत दिली जाते. सदर संस्थेचे कामकाज संस्थापक श्री.राजेंद्र गोसावी हे पाहतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा