You are currently viewing भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी शिवसेना आणि महाविकास आघाडी देणार कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी शिवसेना आणि महाविकास आघाडी देणार कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

*भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी शिवसेना आणि महाविकास आघाडी देणार कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन*

*शिवसेना व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन*

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर इतर दोन निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी किमान १४ वेळा लिखित आक्षेप नोंदवले आहेत. निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था असून तिचे निर्णय बहुमताने किंवा एकमताने घेणे बंधनकारक असते. मात्र, ज्ञानेश कुमार यांनी इतर दोन आयुक्तांच्या विरोधाकडे आणि सूचनांकडे दुर्लक्ष करून अनेक महत्त्वाचे निर्णय ‘एकतर्फी’ आणि चुकीच्या पद्धतीने घेतले आहेत. ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीचा गळा घोटून भारत देशाशी गद्दारी केल्याने त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने, माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महिला आघाडी, युवासेना आणि महाविकास आघाडीचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा