You are currently viewing संध्याकाळ नव्हे संधीकाळ…!!

संध्याकाळ नव्हे संधीकाळ…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*संध्याकाळ नव्हे संधीकाळ…!!*

 

मोठ्यांचे मोठेपण कधीच

मी…मागत नाही

आदरसत्काराने शरीर मन

कधीही …सुखावत नाही..

 

शरीरपोषण करणारं आईशिवाय

जगात ….कुणीही नाही

विद्येसारखं शरीराचं ..दुसरं

कोणतही …भूषण नाही..

 

जिज्ञासा ..हेच जिवन

विज्ञानाने …टोचावे कान

संध्याकाळ नव्हे संधीकाळ

आयुष्यचं…..वयाचा मान..

 

वेषांतर ..सुखदुःखाचे नशिबी

समाधानापेक्षा.. सुख नाही

अज्ञान्याच्या करातली लक्ष्मीही

कधीही ….टिकत नाही..

 

डिस्कनेक्ट होण्याचा हक्क

तुमच्याकडे …सदैव हाताशी

आयुष्यभर जपलेल्या संधीकाळाला

संध्याकाळपर्यंत ..ठेवा ह्दयाशी

 

असंख्य स्वप्नांचे …प्रदेश

आजही …दारातचं उभे

जगणं ..अर्थवाही करणारे

संध्याकाळी संधीकाळाचे मनसुबे

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा