You are currently viewing भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांची मुंबईत भेट
Oplus_16908288

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांची मुंबईत भेट

मुंबई :

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजप युवा नेते विशाल परब यांनी मुंबईत त्यांची प्रत्यक्ष भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशाल परब हे रविंद्र चव्हाण यांना आपले राजकीय गुरु मानतात. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक शुभेच्छांपुरती मर्यादित न राहता गुरु-शिष्याच्या जिव्हाळ्याच्या नात्याची प्रचिती देणारी ठरली.

या भेटीदरम्यान विशाल परब यांनी अत्यंत आदराने व आपुलकीने रविंद्र चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. तसेच प्रेमाने पेढा भरवून वाढदिवसाचा आनंद साजरा केला. हा पेढा स्वीकारताना रविंद्र चव्हाण यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान गुरु-शिष्याच्या नात्यातील अतूट विश्वास, स्नेह आणि आदर स्पष्टपणे दर्शवत होते.

विशाल परब यांच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत रविंद्र चव्हाण यांचे स्थान महत्त्वाचे राहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून मिळालेली योग्य दिशा, जनसेवेची प्रेरणा आणि सकारात्मक दृष्टिकोन याबद्दल विशाल परब यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.

“गुरुंच्या मार्गदर्शनातून मिळालेली प्रेरणा माझ्यासाठी सदैव दिशादर्शक आहे,” अशा भावना विशाल परब यांनी व्यक्त केल्या. गुरुंचा आशीर्वाद पाठीशी ठेवून समाजासाठी अविरत कार्य करण्याची शपथ या खास भेटीतून अधोरेखित झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा