You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्याशी नाळ असलेल्या डॉ लक्ष्मी पाटील आता न्युरोलॉजी स्पेशालिस्ट…

सिंधुदुर्ग जिल्ह्याशी नाळ असलेल्या डॉ लक्ष्मी पाटील आता न्युरोलॉजी स्पेशालिस्ट…

सिंधुदुर्ग जिल्ह्याशी नाळ असलेल्या डॉ लक्ष्मी पाटील आता न्युरोलॉजी स्पेशालिस्ट…

आपला एम.बी.बी.एस अभ्यासक्रम मुंबईतील टोपीवाला मेडिकल कॉलेज (नायर हॉस्पिटल) मधून पूर्ण केल्यानंतर अंधेरी पश्चिम येथील कोकिळाबेन धीरुभाई अंबानी या सातशे खाटा असलेल्या प्रतिथयश हॉस्पिटलमध्ये त्यांनी पद्वीओत्तर शिक्षण राष्ट्रीय किर्ती लाभलेल्या संधीवात तज्ञ डॉ ज्योत्स्ना ओक यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल मेडिसिन विषयात पूर्ण केले होते. दरम्यानच्या काळात त्या चर्नी रोड येथील देशाच्या पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या हरकिशनदास नरोत्तमदास हॉस्पिटलमध्ये सुद्धा दोन वर्षे कार्यरत होत्या. २०१९ मध्ये पुढील शिक्षणाची पुन्हा कास धरत त्या न्युरोलॉजी प्रवेश परिक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांना पुनश्च राष्ट्रीय बोर्डाच्या मेरिट लिस्ट नुसार कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळाला. गेली तीन वर्षे भारतातील प्रतिथयश न्युरोलॉजी स्पेशालिस्ट डॉ मोहीत भट, विल्सन डिसीज या दुर्धर आजारावर निर्णायक संशोधन करणाऱ्या डॉ अनु अग्रवाल , इपिलेप्सी (आकडीचा आजार) यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ जयंती मणी, पक्षाघात आजारावर आंतरराष्ट्रीय स्थरावर अनुभव असलेल्या डॉ तुषार राऊत यासारख्या दिग्गजांच्या विभागात कार्यरत राहून एका महिन्यापूर्वी झालेल्या पदवी परिक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. जिल्ह्याचे सुपुत्र सर्वश्रुत स्वर्गीय एकनाथ केशव ठाकूर यांच्या मावस बहिणीची नात हे त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबत जोडणारे नाते असून भाजपा वैद्यकीय आघाडी चे कोकण प्रभारी डॉ अमेय प्रदीप देसाई यांच्या त्या सौभाग्यवती आहेत. त्यांच्या आई सौ अनुपमा पाटील सांगली सहकारी बैंक, सारस्वत बैंक सारख्या आस्थापनेवर कार्यरत राहून आता निवृत्त झाल्या असून वडील श्री नरेंद्र पाटील एफ.सी.आय चे निवृत्त अधिकारी आहेत. मुंबईत कार्यरत असल्या तरीही त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग जिल्ह्यातील अडलेल्या रुग्णाला निश्चितच होईल अशी खात्री यावेळी डॉ अमेय देसाई यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा