You are currently viewing सिंधुदुर्ग बँकेच्या ६७ लिपिक पदांच्या भरतीसाठी अर्ज करायची मुदत वाढविली; उमेदवारांना २५ सप्टेंबरपर्यंत संधी
Oplus_16908288

सिंधुदुर्ग बँकेच्या ६७ लिपिक पदांच्या भरतीसाठी अर्ज करायची मुदत वाढविली; उमेदवारांना २५ सप्टेंबरपर्यंत संधी

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने टीसीएस (TCS) कंपनीमार्फत राबविण्यात येत असलेल्या ६७ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे.

सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. १७ सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली होती. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र युवक-युवतींना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने अर्ज स्विकारन्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

यानुसार, इच्छुक उमेदवारांना आता दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये शासनाच्या निर्देशांनुसार ७० टक्के जागा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून उर्वरित ३० टक्के जागांसाठी इतर पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या संधीचा लाभ मिळणार आहे.तरी या मुदतवाढीचा लाभ घेऊन पात्र युवक-युवतींनी आपले अर्ज मुदतीत सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी व अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी बॅंकेच्या www.sindhudurgdcc.bank.in या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा