You are currently viewing उपरलकर देवस्थानजवळ भरधाव ट्रक सुरक्षारेलिंगला धडकला

उपरलकर देवस्थानजवळ भरधाव ट्रक सुरक्षारेलिंगला धडकला

उपरलकर देवस्थानजवळ भरधाव ट्रक सुरक्षारेलिंगला धडकला

धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटला; ट्रकचे मोठे नुकसान, चालक सुखरूप

सावंतवाडी

शहरातील उपरलकर देवस्थानजवळील धोकादायक वळणावर भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षारेलिंगला धडकला. आज दुपारी घडलेल्या या अपघातात ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने चालक सुखरूप बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक सावंतवाडी शहरातून जात असताना उपरलकर देवस्थानजवळील वळणावर चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षारेलिंगवर जाऊन आदळला. धडकेमुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले.
अपघाताचा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चालकाला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे समोर आले. घटनेनंतर काही काळ घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. माहिती मिळताच पोलीस व संबंधित प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. त्यानंतर मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा