महामार्गावर जाणवली येथे स्विफ्ट कार व दूध वाहतूक करणाऱ्या बलेरोमध्ये अपघात

महामार्गावर जाणवली येथे स्विफ्ट कार व दूध वाहतूक करणाऱ्या बलेरोमध्ये अपघात

कणकवली

मुंबई गोवा महामार्गारील कणकवली जाणवली येथील तरंदळे फाट्यावरील नवीन ब्रिज वर स्विफ्ट कार व बलेरो एकमेकांवर आदळत अपघात घडला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री उशिरा घडला आहे या अपघातात सावंतवाडी येथील स्विफ्ट कारमधील पती पत्नीसह दोन मुले अशा प्रकारे ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पो चालकाला दुखापत झाली आहे.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील संतोष धोंडी पालकर (वय 37) हे पत्नी समीक्षा पालकर (वय 32) हे दोन मुलांसह फोंडाघाट येथे जात असताना दुधाची वाहतूक करणारी बोलेरो गाडी यांच्यात घडला हा अपघात घडला. जयसिंगपूर येथील स्वाभिमानी दूध घेऊन बलेरो चालक अभिजीत श्रीकांत बादोले (वय 30,रा.उदगाव ता. शिरोळ जि. कोल्हापूर) येत होते. त्यांच्यासोबत अण्णासो आप्पासो शिपोटे (वय 28 ) होता. मुंबई गोवा महामार्गारील कणकवली जाणवली येथील तरंदळे फाट्यावरील नवीन ब्रिज वर हा अपघात घडला.

या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून या अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते दामू सावंत, रंजन राणे, संदीप कदम, यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली व घटनास्थळी पीएसआय सुरज पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण, कॉन्स्टेबल माने यांनी धाव घेतली

प्रतिक्रिया व्यक्त करा