वडगाव धायरी पुणे – दिनांक ३ सप्टेंबर रोजी साताऱ्यातील जागृत ऐतिहासिक देवस्थान खिंडीतील गणपती या निसर्गरम्य परिसरातील मंदिरास पुण्यातील अग्रगण्य साहित्यिक व कवींची संस्था महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे (महाराष्ट्र) यांनी “श्रावणधारा” हा राज्यस्तरीय कविसंमेलनाचा कार्यक्रम केला.
या कार्यक्रमाचे आयोजन खिंडीतील गणपती देवस्थान ट्रस्टने केले होते. ट्रस्टचे माननीय , विद्यमान पदाधिकारी सर्वश्री अशोक गोडबोले , प्राचार्य डॉ. विजयराव खांडेकर , रमण वेलणकर, डॉ . अच्युत गोडबोले , वासुदेव किरवे , अशोक शहा , राजा दीक्षित या सर्वांनी आलेल्या सर्व कवीवरांचे आत्मियतेने सर्वांना फुले देवून स्वागत केले.
प्रथम गणपती मंदिर , दत्तमंदिर , कुरणेश्वर मंदिराचे दर्शन झाल्यानंतरत्या परिसरातील “नक्षत्रवन ” या वृक्षसंवर्धन समिती तर्फे सुमारे ३००० दुर्मिळ वनस्पतींची लागवड कशा पद्धतीने करण्यात आली, त्याचा उद्देश आणि उपयोग याबाबतची सविस्तर मोलाची माहिती प्रा. डॉ. विजय खांडेकर यांनी दिली.
मंदिराच्या सभागृहात सुमारे ३५ कवींचे वैविध्यपूर्ण रचनांचे “श्रावणधारा” हे काव्यसंमेलन पार पडले.सातारकरांनी अत्यंत आत्मियतेने आणि आदराने केलेले सर्व साहित्यिकांचे स्वागत अविस्मरणीय व भावपूर्ण असे ठरले.
विशेष म्हणजे महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी , वि.ग.सातपुते ( सातारकर) , प्रा.डॉ. महेंद्र ठाकुरदास , मा श्री मिलिंद जोशी, बंडा जोशी, मकरंद घाणेकर , सुरेश शेठ, अशोक भांबुरे , शुभदा उदगावकर, जयश्री श्रोत्रिय , यशवंत देव, सुधीर बोकील, प्रमोद मिसाळ, प्रा गिरीश बक्षी, सौ.वंदना घाणेकर, राम किल्लेदार , मनिषा सराफ , अंजली महाजन , प्रज्ञा कांबळे. , त्र्यंबक बोरीकर , ॲड .पाचुणकर , सतीश शिंगवेकर सुधीर कुबेर, राजश्री सोले, जयंत देशपांडे , अंजली डोळे , वसुंधरा निकम , छाया नाळे, नरेंद्र निकम , अमोल मांढरे व मुकुंदशेठ लाहोटी (सातारा) अशा मान्यवर कवींनी आपल्या वैविध्यपूर्ण रचना सादर केल्या. वि.ग.सातपुते यांनी आपल्या भावपूर्ण भक्तिरचनेनी या उपक्रमाची सांगता केली.
वरीष्ठ पत्रकार बाबू डिसोजा यांनी वृत्त आढावा घेतला.
