You are currently viewing मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक

मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक

कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात, ‘वादविवाद इंग्रजी (इंग्लिश डिबेट) या प्रकारात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजचे सहिष्णू सुयोग पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. ह्या स्पर्धेची अंतिम फेरी ८ सप्टेंबर २०२६ रोजी, चर्चगेट येथील विद्यार्थी विद्यापीठ भवनात संपन्न झाली.

सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांचे व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज चेअरमन व्हिक्टर डांटस यांच्यासह प्राचार्य डाॅ. शिल्पा मर्गज, प्राध्यापक संग्राम गावडे आणि प्राध्यापक वर्ग यांच्यासह व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज कुडाळच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा