You are currently viewing बांदा-दोडामार्ग रस्त्यावर झाड कोसळले, वाहतूक विस्कळीत…

बांदा-दोडामार्ग रस्त्यावर झाड कोसळले, वाहतूक विस्कळीत…

बांदा

बांदा-दोडामार्ग राज्य मार्गावर पानवळ येथे आज सकाळी झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे व बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला केले. झाड पडले त्यावेळी वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टाळली. बांदा शहर व परिसरात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभामीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + seven =