You are currently viewing सांगोला येथे लय भारी साहित्य समूहातर्फे पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन संपन्न

सांगोला येथे लय भारी साहित्य समूहातर्फे पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन संपन्न

सोलापूर :

 

सांगोला येथे 22 मे रोजी लयभारी साहित्य समूहाच्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय पहिले कवी संमेलनाचे आयोजन पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर स्मृती भवन सांगोला येथे करण्यात आले होते.

या संमेलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मान्यवर कवी व कवयित्री मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. पियूषदादा साळुंखे पाटील व सांगोला नगरपालिका सांगोल्याचे मुख्याधिकारी मा.कैलास केंद्रे व संमेलानाध्यक्ष कवी गझलकार मा. हेमंत रत्नपारखी, स्वागताध्यक्ष कवी गझलकार मा. विजय खाडे, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.परशुराम कांबळे (विद्रोही कवी पी.के) व उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व वृक्ष पूजन करून करण्यात आले. तसेच औरंगाबाद येथून कवयित्री गायिका सुनिता कपाळे कवयित्री कल्पना अंबुलकर यांच्या स्वागत गीताने सुरुवात करण्यात आली. संमेलनाचे प्रास्ताविक अनिल केंगार यांनी केले तर उपस्थित सर्व पाहुण्यांचा अतिथी देवो भव याप्रमाणे कार्यक्रमाचे स्वागताअध्यक्ष कवी गझलकार विजय खाडे यांनी शाल स्मृती चिन्ह देऊन पाहुण्यांचा सत्कार केला.

यावेळी उपस्थित कवी व कवित्री यांनी आई, वडील, बहीण, भाऊ, पती-पत्नी प्रेमी याच बरोबर शेतकरी, सामाजीक, वास्तविक अशा अनेक विषयांवर दर्जेदार रचना सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी एकूण शंभर कवी व कवयित्री उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर उद्घाटक म्हणून लाभलेले डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील यांनी आपला स्वरचित शेर सादर करून संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या व इथून पुढे होणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारची उणीव भासू देणार नाही मी सर्व आयोजकांच्या समवेत राहून पुढील काळात घेण्यात येणा-या कार्यक्रमासाठी मदत करेन असे आश्वासनही दिले.

तसेच या कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर सभागृह देऊन ज्यांचे मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे सांगोला नगरपालिका सांगोल्याचे मुख्य अधिकारी कैलास केंद्रे साहेब यांनी काही कवी व कवयित्री यांच्या स्वरचित रचनेचा दिलखुलासपणे ऐकण्याचा आस्वाद घेतला व या संमेलनाला शुभेच्छा दिल्या.

तसेच आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी ही उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला व आतापर्यंतच्या काळामध्ये राजकारण व समाजकारण करताना जेवढा आनंद मिळाला नाही एवढा आनंद या संमेलनातुन मिळाला इथून पुढील काळात अशा सुंदर कार्यक्रमासाठी आयोजकांनी जी मागेल ती मदत देण्यास तयार असल्याचे आश्वासन ही त्यांच्या वतीने देण्यात आले. तसेच दै सांगोला वृत्तवेध चे संपादक सचिन भुसे यांनी कोरोना काळानंतर सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच एवढे मोठे साहित्य संमेलन पार पडत आहे आणि या संमेलनासाठी दै. सांगोला वृत्तवेध यांच्या वतीने शुभेच्छाही देण्यात आल्या.

या कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती म्हणून ज्योतीराम मधुकर झांबरे चेअरमन सामाजिक कार्यकर्ते स्वामी समर्थ दूध शीतकरण केंद्र देवडे हे उपस्थित होते.

त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रतून आलेल्या सर्व कवी व कवयित्री यांचे स्वरचित कवितेचे प्रथम सत्र घेण्यात आले. या प्रथमत्रासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आनंद हरी, प्रमुख पाहुणे विशाल पाटील सुरेश वडर, विमलताई माळी (आधुनिक बहिणाबाई) मुबारक उमराणी, अरुण कांबळे, विनिता कदम होते. तर प्रथम सत्राचे सूत्रसंचालन. रानकवी जगदीप वनशिव पुणे यांनी पाहिले.

द्वितीय सत्राचे अध्यक्ष पद पोलीस प्रशिक्षण केंद्र जालनाचे गजानन दराडे, प्रमुख पाहुणे अविनाश शिंदे, प्रवीण बनसोडे, आबासाहेब शेजाळ, लक्ष्मण हेंबाडे, हरीप्रसाद देवकर, विद्य माने.तर सूत्रसंचालन शंकर कदम, उज्वला कदम, यांनी पार पाडले. आलेल्या सर्व सारस्वतांच्या निवासाची,चहा,नाष्टा व भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली होती.

सहभागी सर्व सारस्वतांना सन्मानचिन्ह गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन श्री.अनिल केंगार, श्री.गौसपाक मुलानी, पत्रकार खंडू भोसले, श्री.समाधान मोरे, श्री.संतोष रायबान, सौ.धनश्री वलेकर,श्री.कैलास शिरसागर, श्री.शिवाजी गेजगे, श्री.शिवाजी मोकाशी, टायगर ग्रुप सांगोला तालुका प्रमुख राणीताई चव्हाण, श्री.गजानन दराडे पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना, श्री.प्रमोद सूर्यवंशी, रंजना मांगले,श्री. बिरदेव कोळेकर, श्री.अमीर पटेल, यांनी केले होते.

तसेच कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवर उपस्थित सर्व कवी कवयित्री यांचे आभार गौसपाक मुलानी यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा