कडेपूर / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
भारतीय जनता पार्टीच्या कडेपूर मंडल महिला मोर्चाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पक्ष संघटना अधिक मजबूत करण्या सोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महिला मोर्चाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याचे आवाहन यावेळी श्री देशमुख यांनी केले.
महिलांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी तसेच महिला व समाजकल्याणाच्या विविध योजनांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कडेपूर मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी प्रतीक्षा वाघमोडे, उपाध्यक्षपदी शीतल पवार, कविता पवार, नयना शिंदे व सविता कदम, सरचिटणीसपदी पद्मा सूर्यवंशी व डॉ. स्वप्नाली पाटील, चिटणीसपदी अचल महाडिक, संध्या सूर्यवंशी, सुनिता ढाणे व स्नेहल सूर्यवंशी तसेच कोषाध्यक्षपदी अर्चना घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस मंदाताई करांडे, राजेंद्र पाटील, माजी उपसभापती रवींद्र कांबळे, नेताजीराव यादव, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश गढळे, बेलवडे सरपंच महादेव तवर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नवनियुक्त महिला पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
