You are currently viewing चिपी विमानतळ जोडणारे रस्ते दुरुस्तीसाठी ७ कोटी ५० लाख रु निधी मंजूर

चिपी विमानतळ जोडणारे रस्ते दुरुस्तीसाठी ७ कोटी ५० लाख रु निधी मंजूर

सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता

पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न

खा.विनायक राऊत आ.वैभव नाईक,आ. दीपक केसरकर यांचा पाठपुरावा

चिपी विमानतळ उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ जोडणारे रस्ते दुरुस्तीस सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांतून दोन रस्त्यांसाठी ७ कोटी ५० लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये कुडाळ पिंगुळी म्हापण कोचरे श्रीरामवाडी कोचरेबंदर रस्ता (राज्यमार्ग १८३) ०/०० ते १३/३५० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे निधी ४ कोटी ५७ लाख तसेच मठ कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोटगेरस्ता (राज्यमार्ग १७९)किमी ०/०० ते ११/८५० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे निधी २ कोटी ९२ लाख या रस्त्यांच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मान्यता देण्यात आली. लवकरच या रस्त्यांच्या निविदा प्रकिया पार पाडून कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर याआधीही कुडाळ पिंगुळी पाट रस्त्याच्या दीड कोटीच्या कामाला वर्कऑर्डर देण्यात आली आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 7 =