You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसलाच विजयी करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसलाच विजयी करा

राजू मसूरकर यांचे आवाहन

वैभववाडी, देवगड, कुडाळ, दोडामार्ग या नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांना भरगोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजू मसुरकर यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 2011 व 2012 साली राजीव गांधी जीवनदायी जनआरोग्य योजना दर साल “एक लाख पन्नास हजार”रुपये पर्यंत 971 प्रकारच्या आजारावर मोफत उपचार, मोफत शस्त्रक्रिया ,मोफत औषधे, जेवण व प्रवास खर्च सुरू करून सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना त्याचा मोफत लाभ ज्या व्यक्तींच्या कुटुंबाकडे पिवळे,केशरी , अंत्योदय व अन्नपूर्णा रेशन कार्ड असेल. अशा कुटुंबियांसाठी आरोग्य योजनेचा मोफत लाभ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरू करून दिला आहे.

त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनता या आरोग्य योजनेच्या एक कोटीहून अधिक रुग्णांनी दरवर्षी महाराष्ट्रात वेगवेगळ्या आजारांवरती मोफत लाभ घेतला आहे व घेत आहेत.

तसेच पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी मोतीबिंदू, मलेरिया स्वाइन फ्लू थायलेमेसिया आजार (आठवड्यातून एकदा रुग्णाला रक्त द्यावे लागते) माकडताप, कॅन्सर या आजारांवरती रक्तपुरवठा तसेच अंध,अपंग, मूकबधिर व कर्णबधिर, स्वातंत्र्यसैनिक अशा व्यक्तींसाठी देशांमध्ये कुठल्याही व्यक्तींसाठी आरोग्य योजनेचा मोफत लाभ 60 वर्ष पूर्ण व त्यावरील व्यक्तींना आधार कार्ड महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात दिल्यास मोफत लाभ सर्वसामान्यांना आजपर्यंत मिळत आहे.

तसेच गरोदर स्त्रियांना सुद्धा शासकीय रुग्णालयात मोफत लाभ मिळतो

यामध्ये प्रामुख्याने हदय विकार, कॅन्सर, मेंदूचे आजार, मणक्याचे आजार ,गुडघ्याची शस्त्रक्रिया ,पोटातील आतड्यांची शस्त्रक्रिया, गर्भपिशवी शस्त्रक्रिया अशा वेगवेगळ्या 971 शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील रुग्ण मोफत लाभ घेत आहेत. आता या योजनेचे नाव जून 2017 सालापासून तत्कालीन युती सरकारने महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना या नावाने केले आहे

तसेच माननीय सोनिया गांधी यांनी सर्वसामान्य गोरगरिबांना मनमोहन सिंग पंतप्रधान काँग्रेसचे असताना तीन रुपये किलो गहू, दोन रुपये किलो तांदूळ संसदेमध्ये एक कायदा करून आजपर्यंत ते धान्य सर्वसामान्य गोरगरिबांना देण्याचे महान कार्य माननीय काँग्रेस अध्यक्षा श्रीमती.सोनिया गांधी यांनी रेशन दुकानावरती देण्याचे महान कार्य केले आहे ते आज पर्यंत सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मिळत आहे.*

तसेच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वेगवेगळ्या निरनिराळ्या कर्णबधिर ,मूकबधिर, अंधबधिर, मतिमंद ,अस्थिव्यंग, इत्यादी प्रौढ वर्गातील स्त्री व पुरुष तसेच क्षयरोग ( टी.बी ), पक्षाघात ( पॅरॅलिसिस ) ,प्रमस्तिष्कघात ( मेंदूचे कार्य मंदावणे ) ,कर्करोग ( कॅन्सर ) ,एड्स ( एचआयव्ही ), कुष्ठरोग ( त्वचाविकार ) ,सिकलसेलॲनिमिया होऊन आजारी राहून सतत रक्त कमी होणे.

तसेच तृतीयपंथी, समलिंगी, निराधार , विधवा पत्नी, घटस्फोटीत महिला परंतु न्यायालयातुन पोटगी न मिळणे. तसेच परित्यक्ता (देवदासी महिला ) अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला , तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबाच्या प्रमुखाच्या पत्नी, तसेच 18 वर्षाखालील अनाथ मुले/ मुली, मुस्लिम समाजातील घटस्फोटित स्त्रिया , 65 वर्षावरील स्त्री किंवा पुरुष यांना मुली असतील किंवा मुलगा 25 वर्षापर्यंत अशा व्यक्ती बलात्कारित महिला , किंवा शारीरिक छळवणूक झालेल्या अत्याचारित स्त्रियांसाठी, सुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सिव्हिल सर्जन यांच्याकडून दाखला घेणे, व महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र तसेच तालुक्याच्या पोलीस ठाण्यामधून गुन्ह्याची नोंद झाल्याचे प्रमाणपत्र पोलिसांकडून घेणे आवश्यक आहे.

तसेच 35 वर्ष पूर्ण व त्या वरील अविवाहित मुली अशा व्यक्तींसाठी तालुक्याच्या तहसील कार्यालय संजय गांधी कक्षामार्फत या योजनेअंतर्गत मासिक मानधन देण्याचे कार्य काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होत आहे. आता हे पूर्वीचे मासिक मानधन 300 वरून 600 व 600 वरून 1000 या योजनेअंतर्गत सुरू झाले असून याचे महान कार्य काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाले आहे

यासाठी उत्पन्नाचा दाखला पन्नास हजार खालील अंध, अपंग, मूकबधिर व कर्णबधिर, अस्थिव्यंग अशा व्यक्तींसाठी असणे आवश्यक आहे.

त्याच प्रकारे उर्वरित व्यक्तींसाठी 21000 खालील उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक असते.

यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नगर पंचायत निवडणुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांना निवडणून घ्यावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा