You are currently viewing कु.पार्थ राऊळ जिल्ह्यात दुसरा तर तालुक्यात प्रथम ..

कु.पार्थ राऊळ जिल्ह्यात दुसरा तर तालुक्यात प्रथम ..

मळगाव हायस्कुल चे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश…

मळेवाड
महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे मार्फत फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कुल, मळगाव ने उज्ज्वल अस यश संपादन केला आहे. प्रशाळेचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण बारा विद्यार्थी प्रविष्ठ झाले. त्यापैकी नऊ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन चार विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. कु.पार्थ प्रशांत राऊळ याने राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती मिळवून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक तर तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याला ८३.६७ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तर कु.निरंजन अमरदीप वेंगुर्लेकर (७०.७६) गुण प्राप्त झाले असून ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. कु.तेजल विजय सावंत (५९.१८)टक्के गुण व कु.स्वप्नील जोतिबा फडके या दोघांना हि ग्रामीण सर्व साधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली. प्रशाळेचा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती चा निकाल ७५ टक्के लागला आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इ.५वी, एकूण बारा विद्यार्थी प्रविष्ठ झाले. त्यापैकी नऊ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशाळेचा निकाल ७५ टक्के लागला आहे. यात कु.निधी चंद्रकांत राऊळ हि जिल्ह्यात २१ वी तर तालुक्यात ४ थी आली आहे. तिला ८१ .९४ टक्के गुण प्राप्त झाले असून ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली. कु.शांताराम महेश गुडेकर याने ८१.२५ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात २४ वा ,तर तालुक्यात आठवा आला आहे. कु.मृण्मयी अनिल नाईक (७६.३८)टक्के असून ती जिल्ह्यात ६७ वी आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रज्ञा मातोंडकर,नेहा गोसावी, राजाराम गोळ्यालकर सुनील कदम, शैलजा परुळकर, मारुती फाले, ओमप्रकाश तीवरेकर, विठ्ठल सावंत, संदीप कारीवडेकर, ऋतुजा सावंतभोसले यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या मळगाव ऐक्यवर्धक संघ , मुंबईच्या संस्थेचे अध्यक्ष मंळगावकर, सचिव राजाराम राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ, शाळा समिती चेअरमन राजेंद्र परब, व सदस्य मनोहर राऊळ, यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक, तसेच मुख्याध्यापक वैजनाथ देवण, पर्यवेक्षिका श्रद्धा सावंत यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + seventeen =