मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड!
सावंतवाडी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तर्फे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या इयत्ता दहावीतील दोन विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली.
१७ वर्षे खालील वयोगट मुले यामध्ये कु. विभव राऊळ याने तृतीय क्रमांक पटकावला तर कु.पार्थ गावकर याने चतुर्थ क्रमांक मिळवला.या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सह- संचालक ॲड .शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री.भूषण परब, अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
