*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रक्षाबंधन….*
नारळी पौर्णिमा
राखीची महती
रेशीम धाग्यात
बहिणीची प्रीती….
रंगीत रेशमी
धागे मुलायम
जोडती मनाला
बंधन कायम ….
भाऊ येता घरा
आनंदे बहीण
ओवाळणीचा तो
आनंदाचा क्षण..
भेट ती भावाची
मौल्यवान फार
कशीही असू दे
किंमत अपार..
बहिणीचा बंध
असतो अपूर्व
भावाच्या भेटीचा
बहिणीला गर्व…
नारळ स्निग्धता
गूळ त्यास जोडी
होई एकरूप
येई सर्व गोडी…
उज्ज्वला सहस्रबुद्धे, पुणे
