You are currently viewing घन बरसत यावे असे पावसाने

घन बरसत यावे असे पावसाने

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम भावगीत*

 

*घन बरसत यावे असे पावसाने* 

 

 

घन बरसत यावे असे पावसाने

चुंबावेआलिंगावे,पृथेला आवेगाने||धृ

 

व्याकुळ विरहीणी,साही ऊन्हाचा हा मारा

काहिली अंगाची,शोधे त्यावर ती उतारा

नभी दाटता कृष्ण मेघ,पाही आशेने

घन बरसत यावे असे पावसाने.

 

साहवेना व्यथा, तळमळ अंतरीची

तगमग कळेना प्रियाला जीवाची

चाहूल प्रियकराची,प्रेमी नाचे हर्षाने

घन बरसत यावे असे पावसाने.

 

संपला विरह, प्रेमीकेचा नी धरेचा

आगमन”त्याचे” फुलवी धरेला प्रियेला

रोमांचल्या दोघी, शांतावल्या मिलनाने

घन बरसत यावेअसे पावसाने.

 

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा