You are currently viewing दिवस सुखाचे

दिवस सुखाचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांची अप्रतिम काव्यरचना*

*कलिंदनंदिनी वृत्त*
(लघु गुरू सूट घेऊन)

*दिवस सुखाचे*

सुखातले दिवस जगून दुःख ते भुलायचे
सुखात या हसायचे सुखात धुंद व्हायचे !!धृ!!

कळी हळूच उमलली बहार येउनी फुले
हवेस काय ज्ञात रे हवेवरी कळी डुले
हवेत स्वार होउनी नभांगणी उडायचे
सुखात या हसायचे सुखात धुंद व्हायचे !!१!!

नवानवा निसर्ग भासला मला हवा तसा
पहाट वेळ भूवरी हसे खिडकित कवडसा
सकाळच्या छटा सुवर्ण लेवुनी नहायचे
सुखात या हसायचे सुखात धुंद व्हायचे !!२!!

दिसे टिपूर तारकांत सांज मज हि अप्सरा
नभातला चकोर चांदवा भुलवितसे धरा
अशाच धुंद सांजवेळच्या कवेत जायचे
सुखात या हसायचे सुखात धुंद व्हायचे !!३!!

©[दीपि]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =