You are currently viewing पाठवणी २१ व्या शतकातली-

पाठवणी २१ व्या शतकातली-

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री डॉ.गौरी एदलाबादकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*पाठवणी २१ व्या शतकातली-*

खेळवली एकुलती एक
लेक कडेवर,
सासरी चालली म्हणून
आला गहिवर!

मुलासमच वाढवल
आम्ही तुला जरी
सांगतो तुला काही
लक्षात ठेव तरी!

सोड आता तुझा
स्वभाव हट्टी,
नको करूस
सासरशी कट्टी!

कर जरा सासरवरही
थोडीशी माया,
मुलगा वाढवाया
त्यांनीही झिजवली काया!

पुर्वी म्हणत दिल्या घरी
तू सुखी रहा,
आता दिल्या घराला
तू सुखी ठेव पहा!

माहेरी नाही फिरकली
कधी स्वयंपाकघरात
पण रोजच स्विगी
झोमॅटो नको बोलावू दारात!

उठत नव्हतीस इथे
वाजले जरी दहा,
तिकडे स्वयंपाक नाही तर
निदान कर चहा !

स्वैराचाराला तू
जरा आता सावर,
घर नाही तर तुझी
खोली तरी आवर!

थोडी तडजोड करायची
ठेव मनाची तयारी,
ऊठसूठ घिरट्या
घालू नको माहेरी !

कुरबूर चालतेच पण
नको करू भांडणं जास्ती,
टिकेल ना लग्न याची
दोन्ही मायबापा धास्ती!

डॅा गौरी एदलाबादकर

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + six =