You are currently viewing शेवयाची शाही खीर

शेवयाची शाही खीर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. संध्या कुलकर्णी लिखित अप्रतिम पाककृती*

 

*शेवयाची शाही खीर*….

 

साहित्य_: दूध, खारीक पावडर, काजू, बदाम, पिस्ते, केशर, साखर, शेवया, तूप, चारोळी, थोडा खवा..सर्व अंदाजे

कृती_: दूध चांगले आटवून बाजूला ठेवावे. फ्राय पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स भाजून बाजूला ठेवावे त्यानंतर थोडी खारीक पावडरही भाजून बाजूला ठेवावे त्यानंतर कढईत तूप घालून शेवया छान खमंग भाजून घ्याव्यात नंतर त्यात गरम पाणी घालून किंवा दूध घालून शिजवून घ्यावे. शेवया छान शिजल्या दूध किंवा पाणी पूर्ण आटले की मग त्यात आपण आठवलेले दूध घालावे. त्यामध्ये खवा खारीक पावडर काजू बदाम पिस्ते चारोळी केशर हे सर्व घालून परत उकळत राहावे. तुम्हाला हवे तसे घट्ट दाटसर झाले की गॅस बंद करून त्यात वेलची आणि जायफळ पावडर घालावी. त्यानंतर खीर कोमट झाल्यावर साखर घालून मिक्स करून ठेवून द्यावे. छान मस्त *शेवयाची शाही खीर तयार*..😋😋

*टीप*_: बासुंदी, शेवयाची खीर, मसाला दूध असे कोणतेही पदार्थ करताना गरम असताना साखर घालू नये .जर त्यावेळी गरम असताना साखर घातली तर साखर विरघळून आपण आटवलेले दूध परत पातळ होते. म्हणून असे सर्व पदार्थ करताना ते कोमट झाल्यावरच साखर घालून विरघळून घ्यावे. परत जर गरम हवे असेल तर अगदी थोडेसेच गरम करून खाण्यास घ्यावे….🙏

२) हे पदार्थ शक्यतो नॉनस्टिक फ्राय पॅन मध्ये केल्यास लवकर होतात. दाटसरपणा लवकर येतो. खूप वेळ आट वायची गरज पडत नाही.

३) अंदाजे एक लिटर दुधाला अर्धी ते पाऊण वाटी साखर बास होते. जर कोणाला अजून गोड हवे असेल तर.. एक लिटर दुधाला एक वाटी साखर घेऊ शकता…. पण ज्यावेळी आपण ह्यात खारीक पावडर खवा असे पदार्थ वापरतो त्यावेळी त्यातही गोडसरपणा असल्यामुळे साखर कमी घातले तरी गोडीला बरोबर होते….

*शेवटी तुमची चव आणि तुमची आवड*..😊🤝🙏

 

*सौ संध्या कुलकर्णी*…

प्रतिक्रिया व्यक्त करा