*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वैभव श्रावणाचे*
कूठे दडती कृष्णमेघ,
अचानक कोसळे श्रावणसर,
दूधाळ फेसाळ झिम्माड झड,
खेळ संपता पसरे ऊन भूवर.
पानोपानी श्रावणपालवी डुले,
तरूवेलींना सुगंधित बहर खुले,
हा शुभ्र बहर फुलांचा,
ऐश्वर्यच श्रावणाचे
फूले.
फेसाळ झिम्माड सर लोभस,ण सुगंधित शुभ्र फुलांचा बहर,
चैतन्याचे तोरण दारावर,
मांगल्याचे प्रतिक श्रावण खरोखर.
ऊन पावसाचा खेळ धरतीवर,
सौख्याचे झोपाळे कदंबावर,
प्राजक्ताचा बहर ओघळे अवनीवर,
कधी सप्तरंगी इंद्रधनू ऊभे राही क्षितिजावर.
अनुराधा जोशी.
9820023605
