विटे, ( प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार )
विटे येथील श्री राजेंद्र टकले यांच्या कन्या डॉ. निकिता. आर. टकले यांना संशोधनात्मक कार्यासाठी प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्ञान, संशोधन, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश म्हणजे संपूर्ण विटेकरांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.
अहमदाबाद, गुजरात येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या रजनीभाई पटेल PharmInnova Awards 2025–26 या पुरस्कार सोहळ्यात डॉ. निकिता आर. टकले यांना Ph.D. – Pharmacognosy या विभागातील उत्कृष्ट संशोधनासाठी प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या भव्य आणि मानाच्या पुरस्कार सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि उपमुख्यमंत्री हर्षभाई संघवी यांच्या प्रमुख उपस्थितीने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
PharmInnova Award हा Pharmaceutical Sciences क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन, वैज्ञानिक योगदान, उत्कृष्ट Thesis आणि संशोधनातील गुणवत्ता यांचा गौरव करणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.
अधिकृत PharmInnova विजेत्यांच्या यादीत Nikita R. Takale – Ph.D., Pharmacognosy अशी नोंद करण्यात आली आहे.
डॉ. निकिता टकले यांनी औषधी वनस्पती, त्यातील जैव-सक्रिय घटक आणि त्यांच्या संभाव्य औषधी उपयोगाच्या शास्त्रीय अभ्यासाशी संबंधित संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनवृत्तीची आणि सातत्यपूर्ण परिश्रमाची दखल घेत त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
