You are currently viewing प्रसिद्ध वकील व संगीत शिक्षक विवेक गोखले यांचे निधन

प्रसिद्ध वकील व संगीत शिक्षक विवेक गोखले यांचे निधन

प्रसिद्ध वकील व संगीत शिक्षक विवेक गोखले यांचे निधन

वकिलीबरोबरच संगीत क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान; ‘हाच मुलाचा बाप’ नाटकातील भूमिकेची विशेष आठवण

फोंडाघाट :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील, संगीत शिक्षक व कलाप्रेमी विवेक गोखले यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, कायदा आणि सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
विवेक गोखले यांचे वकिली क्षेत्रात मोठे नाव होते. वकिलीच्या व्यवसायाबरोबरच त्यांना संगीताची विशेष आवड होती. त्यांनी अनेकांना गायनाचे धडे देत संगीताची आवड जोपासली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटविला होता. ‘हाच मुलाचा बाप’ या संगीत नाटकात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाची आणि संगीत क्षेत्रातील योगदानाची आठवण सहकाऱ्यांसह रसिकांच्या मनात कायम राहणार आहे.
विवेक गोखले यांचे वडील गोखले सर हे फोंडाघाट येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. त्यांनीही आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीत अनेक विद्यार्थी घडविले. त्यामुळे गोखले कुटुंबाचे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय राहिले आहे.
विवेक गोखले यांच्या निधनाने एक संवेदनशील वकील, संगीतप्रेमी आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाबद्दल फोंडाघाटसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
अजित नाडकर्णी व कुटुंबीय, फोंडाघाट यांच्यावतीने विवेक गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा