You are currently viewing तारकर्ली येथे जमावाने तरुणाला मारहाण, शिवीगाळ करत दिली धमकी

तारकर्ली येथे जमावाने तरुणाला मारहाण, शिवीगाळ करत दिली धमकी

तारकर्ली येथे जमावाने तरुणाला मारहाण, शिवीगाळ करत दिली धमकी

देवबाग येथील तरुणाची मालवण पोलीस ठाण्यात तक्रार : तारकर्ली येथील दहा जणांवर गुन्हा दाखल

मालवण

तारकर्ली येथील दहा जणांच्या जमावने एकत्र येऊन मारहाण, शिवीगाळ केली. तसेच मालवण परीसरात फिरू देणार नाही अशी धमकी दिली. अशी तक्रार देवबाग राउळवाडी येथील मच्छिमार तसेच पर्यटन मार्केटींग व्यावसायिक पंकज रविंद्र केळुसकर (वय २२) यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे.

 

दरम्यान, या प्रकरणी तारकर्ली येथील संशयीत आरोपी कांचन केरकर, जितेश केरकर, समीर गोवेकर, नितीन तोडणकर, नितेश तोडणकर, हेमराज सावजी, सुनिल मोंडकर, प्रशांत केळुसकर, महेश खराडे, रोहन मयेकर यांच्या विरोधात भादवि कलम 143, 147, 149, 323, 504, 506, 341 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारकर्ली येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

 

पंकज केळूसकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, आपल्या ताब्यातील मोटारसायकल व कांचन केरकर यांच्या मोटरसायकलच्या वादाच्या कारणा वरुन १० जण एकत्रीत आले. कांचन केरकर याच्याशी केलेल्या हुज्जती बाबत माफी माग असे सांगत त्यांनी मला व माझ्या सहका-यांना मारहाण करुण शिवीगाळ केली. तसेच मालवण परीसरात तुला फीरु देणार नाही अशी धमकी दिली. असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनखाली मालवण पोलीस करत आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा