You are currently viewing सावंतवाडीतील कावेरी हॉटेलचे मालक संजय सावंत यांचे निधन

सावंतवाडीतील कावेरी हॉटेलचे मालक संजय सावंत यांचे निधन

सावंतवाडी :

 

सावंतवाडी शहरातील कावेरी हॉटेलचे मालक संजय श्रीराम सावंत (५२, रा. सालईवाडा ) यांचे गुरुवारी पहाटे गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेली कित्येक वर्ष ते शहरात हाॅटेल व्यवसाय करत होते. कोलगांव येथे कलेश्वर सॉ मिल चाही त्यांचा व्यवसाय होता. बुधवारी त्यांना उपचारार्थ गोवा बांबूळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे नेमक कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, पत्नी ,दोन मुलगे,भाऊ, विवाहीत बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मिक निधनामुळे सावंतवाडी शहरात शोक व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा