You are currently viewing ती म्हणते

ती म्हणते

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित काव्यरचना*

 

*ती म्हणते* 

 

आज मला ती अशी भेटली

कस्तुरगंधी श्वास जाहला

नयनांची ही खात्री होता

निस्संगच ही काम जाहला ।।

 

तिच्या मनाने मनात माझ्या

एक वेगळा इमला केला

राहु लागली सहज मोकळी

इतुके जपले अमला केला ।।

 

भारावुन मी ऐसा गेलो

तिच्यात अवघा मिसळुन गेलो

आणि अचानक अघटित घडले

पूर्ण सदाचे विघटित झालो ।।

 

दिसता मी ती खाली बघते

अथवा मानच वळवुन घेते

असे काहिसे बोलुन जाते

मनास माझ्या पळवुन नेते ।।

 

भानावर मी येतो जेंव्हा

मी तर तेंव्हा माझा नसतो

आठवणींना पिवून सार्‍या

ती म्हणते मी माझा असतो ।।

 

*सर्वस्पर्शी*

*©कविवर्य वैद्यराज भूपाल देशमुख.*

*नासिक -९८२३२१९५०*

प्रतिक्रिया व्यक्त करा